logo

राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन

राजस्व समाधान शिबीर : अमळनेरात ६५० नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते समाधान शिबीराचे उद्घाटन

एकाच छताखाली सर्व सेवा – अमळनेरात समाधान शिबीर यशस्वी

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासर्नानर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत " तालुका स्तरावर नागरिकांसाठी दिनांक 18/09/2025 (वार गुरूवार) रोजी तहसिल कार्यालय व पंचायत समीती आवार, अमळनेर ता. अमळनेर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन मा. खासदार स्मिताताई वाघ. जळगाव लोकसभा मतदार संघ यांचे हस्ते करण्यात आले.
सदर शिबीरात श्री. रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर, श्री. नरेंद्र पाटील गटविकास अधिकारी अमळनेर, श्री. तुषार नेरकर मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर, श्रीमती प्रेमलता पाटील महिला व बालकल्याण अधिकारी, श्री. चंद्रकांत ठाकरे तालुका कृषी अधिकारी, श्री. अजय कुलकर्णी महसुल नायब तहसिलदार, श्री सी.यु.पाटील निवासी नायब तहसिलदार, श्री. प्रशांत धमके निवडणुक नायब तहसिलदार, श्री. राजेंद्र ढोले संजय गांधी योजना नायब तहसिलदार व तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे/समस्यांचे निराकरण करुन वंचित लाभार्थीना मा. खासदार स्मिताताई वाघ, जळगाव लोकसभा मतदार संघ व श्री. रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर, डॉ अनिल शिंदे,भैरवीताई वाघ पलांडे,
यांचे हस्ते प्रमाणपत्र/धनादेशाचे वाटप करण्यात आले. उक्त शिबीरात खालील कार्यालयांकडून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.

लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या
पुरवठा शाखा तहसिल कार्यालय अमळनेर
91- नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका
संगायो शाखा तहसिल कार्यालय अमळनेर
251 डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
03 - राष्टीय कुटूंबलाभ योजना,02 - नवीन लाभार्थी यांचे अर्ज भरुन घेण्यात आले.
3 सेतु शाखा तहसिल कार्यालय अमळनेर
101 - उत्पन्नाचे दाखले वितरण,71 - राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वितरण,71 - रहिवासी प्रमाणपत्र वितरण,78 - जातीचे दाखले वितरण,31- आधार नोंदणी,159- आधार दुरुस्ती,02 - प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत इलेक्टिक मोटार,07 - प्रधानमंत्री आवास योजना शहरी नविन घरकुल मंजुर,4 कृषी विभाग,5 नगरपरिषद अमळनेर 05 - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना चावी वाटप (गृहप्रवेश)
- आयुष्यमान भारत कार्ड,03 - राष्टीय नागरी उपजिवीका अभियान बचत गटांना कर्ज वाटप
06 - PPE Kit सुरक्षा साहित्य वाटप,12 - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रशस्तीपत्र वाटप,29 - घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय जमीनीचे वाटप,08 - उमेद अभियान अंतर्गत बचत गटांना कर्ज वाटप,पंचायत समिती अमळनेर
03 - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल पुर्ण झालेल्या,लाभार्थ्यांना चावी वाटप (गृहप्रवेश)
सदर शिबीरात अंदाजे 600 ते 650 लोकांनी उपस्थिती नोंदवून समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मा.श्री. रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली. संजय पाटील, यांनी सुत्रसंचालन केले. तसेच श्री. प्रशांत धमके, निवडणुक
नायब तहसिलदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

46
2776 views