logo

भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा यांचा जनआक्रोश मोर्चा यशस्वी



सातारा – भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील आंबेडकरवादी विचारधारा जोपासणाऱ्या संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. अशोक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा शांततेत आणि संयमाने पार पडला.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन जनमानसात बौद्ध महासभेच्या माध्यमातून नवा उत्साह निर्माण केला. तसेच ट्रस्टी आदरणीय अरुण भाऊ पोळ, जिल्हाध्यक्ष आयु.अरुण भोसले, आयु.नानासाहेब मोहिते, महिला जिल्हा अध्यक्षा संगिताताई डावरे, जिल्हाध्यक्षा सुजाताताई गायकवाड, बनसोडे ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आयु. व्ही.आर. थोरवडे, आयु. दिलीप फणसे, आयु. यशपाल बनसोडे, आयु. अरुण गायकवाड, आयु. सचिन आढाव, आयु. मिलिंद कांबळे, आयु. भागवत भोसले, आयु. काशिनाथ गाडे, आयु. उत्तम पवार, आयु. महादेव शेलार, आयु. पोपट यादव आदींनी सक्रीय सहभाग नोंदवत आपली जबाबदारी प्रगल्भतेने पार पाडली.

संरक्षण उपाध्यक्ष आयु. महादेव शेलार यांच्या नेतृत्वाखाली डिव्हिजन ऑफिसर आयु. पिराजी सातपुते, आयु. सुनिल सकपाळ आणि समता सैनिक दलाच्या महिला-पुरुष कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मोर्चाला भरभरून यशस्वी केले. याप्रकारे सर्व सातारकरांचे लक्ष वेधून घेतले गेले असून सर्व स्तरातून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले जात आहे.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी सातारा तालुका अध्यक्ष आयु. ॲड. विजयानंद कांबळे, कराड तालुका अध्यक्ष आयु. यशवंत आप्पा अडसूळे, पाटण तालुका अध्यक्ष आयु. आनंदा गुजर, जावळी तालुका अध्यक्ष आयु. मोहन खरात, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष आयु. नितीन गायकवाड, वाई तालुका अध्यक्ष आयु. आनंदा कांबळे आणि त्यांच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनीही परिश्रम घेतले.

या ऐतिहासिक जनआक्रोश मोर्चातून भारतीय बौद्ध महासभेच्या उद्दिष्टांना जनमानसात अधिक बळकटी मिळाली असून, जिल्हाध्यक्ष आयु. अशोक भालेराव यांच्या वतीने सर्व सहभागी कार्यकर्त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करण्यात आले आहे. त्यांनी असे सहकार्य भविष्यातही सातत्याने सुरू ठेवावे, असे आवाहन केले आहे.

0
944 views