
भामा आसखेड धरण 100% भरले आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते जलपूजन
-आसखेड धरण शंभर टक्के भरले असून, धरणातील जलपूजनाचा सोहळा आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी धरणातील जलाशयात साडी-चोळी व पुष्पहार अर्पण करून जलश्रेयं अर्पण करण्यात आले.
धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत ९५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी ६७१.५० मीटर असून, धरणात सध्या ८.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे काही दिवस सुरू असलेला विसर्ग आता बंद करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जलसंपादन विभागाचे अध्यक्ष अभियंता कुमार पाटील, उपअभियंता मोहन जाधव, सहाय्यक अभियंता अश्विन पवार, माजी पंचायत समिती सदस्य वसंत ढोकरे, रोहिदास गडदे, शिवसेना तालुका संघटक सुभाष मोंडकर एल. पी. तनपुरे, संतोष राक्षस, अंकुश दरेकर, रमेश बोराटे, चंद्रकांत सातपुते, अमोल पाचपुते, अभय डेंगळे, शशिकांत आहेरकर, मारुती धनवटे, सचिन तुळवे यांच्यासह नागरिक व धरण प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भामा-आसखेड धरणामुळे खेड, शिरूर, दौंड, हवेली या तालुक्यांसह पुणे महानगरपालिकेच्या पूर्व भागाला, आळंदी शहराला, खेड एमआयडीसीला आणि तालुक्यातील १९ गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे