उत्सव गौरी मातेचा*
*उत्सव गौरी मातेचा*
ज्येष्ठ आणि कनिष्ठा
गौरींचे झालं आगमन
घरोघरी प्रसन्न वातावरण
आनंदाचे जणू उधाण
तीन दिवस
गौरीमातेचा निवास
सोळा भाज्यांचा
नैवेद्य खास
पहिल्या दिवशी
बाजरीची भाकर
मेथीची भाजी
नैवेद्य खास
दुसऱ्या दिवशी
गौरीमातेच पूजन
पुरणपोळीचा नैवेद्य
सोबती पाचीपक्वान्न
मेथी,अळू,कारले,घोसळी, भेंडी
पडवळ, टोमॅटो गवार, हरभरा
आंबटचुका, बटाटा,तांदूळका
पालक,शेपू, कोबी, राजगिरा
अशा भाज्यांचा
नैवेद्य खास
मंदिरात
देविचा वास
गौरी माता
ठेव सर्वांना सुखी
तुझें नाम
आम्हा सर्वांच्या मुखी
कवी
अनुपमा जाधव
ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, कथाकार, सामाजिक कार्यकर्ती
डहाणू