
मौजा अहेरी येथे मोटर सायकलचालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई.
मौजा अहेरी येथे मोटर सायकलचालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई.
अहेरी येथे मोटर सायकलचालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई. माननीय पोलीस अधीक्षक, श्री. निलोत्पल सा. गडचिरोली यांनी शहरातील वाहतुक शिस्तबद्ध पद्धतीने अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहन चालकावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक 29/09/2025 रोजी अहेरी शहरात मोहीम राबवून वाहतुकीच्या नियमाची उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या दरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत 09 अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आले.09 मोटार सायकल धारकावर कारवाई करून 09 मोटार सायकल डिटेल करण्यात आले. व यापुढे अल्पवयीन मुले मोटर सायकल चालवताना आढळून आल्यास संबंधी पालकांवर कडक कारवाई करण्यात येईल. मा. श्री. निलोप्पल सा.पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. श्री. सत्य साई कार्तिक सा. अप्परपोलीस अधीक्षक अहेरी व मा. श्री. अजय कोकाटे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी, यांच्यामार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरीक्षक श्री. हर्षल एकरे साहेब, मा.सपोनी मंगेश वळवी सा. व वाहतूक शाखा अहेरी पोहवा विजय कुमरे, नापोशी ज्ञानेश्वर निलावार, मपोशी पूजा पाटील , पोलीस स्टेशन स्टॉप, यांनी सदरची कारवाई केली आहे.