
शेवगांव: चटणी अन् भाकरी, मराठा बांधवांसाठी गाव खेड्यातून टेम्पोभर जेवण मुंबईकडे
शेवगांव: मुंबई येथे सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी शेवगांव तालुक्यात भगूर अमरापूर व फाळकेवाडी या तीन खेडेगावांनी एक एक शिदोरी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मुंबइ येथील आंदोलनाच्या ठीकाणी उपस्थित असलेल्या समाजबांधवांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे आदी अन्नपदार्थ मुंबइला पाठविण्यात आले. भगूर अमरापूर व फाळकेवाडी येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 5 हजार लोकांसाठी आवश्यक जेवण भाकरी ठेचा आदी साहित्य तसेच 2500 हजार पाण्याच्या बाटल्या पाठविण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असेपर्यंत शेवगांव मधून ही शिदोरी पाठविली जाणार आहे.
भगूर येथे शहर आणि तालुक्यातील समाजबांधवांनी अन्नपदार्थ आणुन जमा केले. यावेळी जमा झालेल्या अन्नाची शिदोरीचे पॅकींग करण्यासाठी तरुण मंडळी एकत्र येत यंत्रणा राबविली. तसेच समाजबांधवांनी एकत्र येत सहित्य नियोजनबध्द जमा केले. एक घास माणुसकीचा एक हात मदतीचा, या अंतर्गत समाजबांधवांना आज दुपारी सोशल मिडीयावर आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला समाजबांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मुंबई येथील समाजबांधवांसाठी शनिवारी(दि ३०) सायंकाळी स्वतंंत्र शिदोरी पाठविण्यात आली.