logo

क्राॅफर्ड मार्केट, मुंबई येथे अवैध वन्यजीव व्यापाराविरुद्ध मोठी कारवाई – २२६ जिवंत व ११ मृत संरक्षित वन्यजीव जप्त .

मुंबई, शुक्रवार , दि. ८ ऑगस्ट २०२५ – उपवनसंरक्षक , वनविभाग ठाणे ; वनपरिक्षेत्र अधिकारी मुंबई ; वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो ( WCCB ), ठाणे पोलिस तसेच Wildlife Welfare Association ( WWA ) यांच्या संयुक्त मोहिमेत क्राॅफर्ड मार्केट , मुंबई येथे अवैधरीत्या विक्रीस ठेवलेले २२६ जिवंत व ११ मृत संरक्षित भारतीय वन्यजीव ताब्यात घेण्यात आले .

जप्त वन्यजीवांची यादी

जिवंत वन्यजीव:

अलेक्झांड्राइन पोपट – १०

रिंग - नेक पोपट – ११२

इंडियन स्टार कासव – ६७

इंडियन टेंट कासव – १०

इंडियन रूफ कासव – १६

इंडियन आय कासव – १०

इंडियन सॉफ्टशेल कासव – १


मृत वन्यजीव :

रिंग-नेक पोपट – ११


कायदेशीर कारवाई

ही कारवाई वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील कलम ९, ३९, ४८, ४८( अ ), ४९अ ( अ ) , ४९ ब व ५१(१) अंतर्गत करण्यात आली असून संबंधित आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू आहे .

वन्यजीवांची सुरक्षितता

जप्त करण्यात आलेल्या सर्व जिवंत प्राणी - पक्ष्यांना आवश्यक पशुवैद्यकीय उपचार दिल्यानंतर सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे .

वनविभागाचे आवाहन

भारतीय वन्यजीवांचे बंदिस्त पालन , विक्री किंवा शिकार करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे . नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती मिळताच जवळच्या वनविभागास कळवावी किंवा वनविभागाचा टोल - फ्री क्रमांक १९२६ वर तात्काळ संपर्क साधावा .

श्री . वैभव पद्माकर कुलकर्णी .
स्वयंसेवक, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो .
( WCCB )

22
1644 views