logo

स्व गुलाबराव गोरे शिक्षण संस्था चाकण ज्ञानवघिनी विद्यालय चाकण पुणे

स्व.गुलाबराव गोरे शिक्षण संस्था चाकण.
ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण.
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाकण आणि
भामा इंग्लिश मिडीयम स्कुल चाकण येथे शिक्षक व विद्यार्थी यांनी आषाढी एकादशी श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य मा. नितीनभाऊ गोरे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे, संचालक ओंकारभाऊ गोरे, ज्ञानवर्धिनी विद्यालय मुख्याध्यापिका प्रमिला गोरे,स्व. आ. सुरेशभाऊ गोरे ज्युनियर कॉलेज प्राचार्य सचिन आभाळे व भामा इंग्लिश मिडीयम स्कुल प्रिन्सिपल माधुरी गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सर्व विभाग शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. नितिनभाऊ गोरे यांनी प्रदूषण मुक्त दिंडी यासंकल्पनेतून पाणी प्रदूशन न करणे, प्लास्टिक वापर कमी करणे, झाडे लावून पर्यावरण वाढविणे आपला परिसर स्वच्छ ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे याबाबत मुलांना मार्गदर्शन केले. विकासभाऊ गोरे यांनी मुलांना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी समाजाला दिलेली शिकवन, अध्यात्मिक विचार आत्मसात करून विज्ञान युगातही आपण पुढे जाऊ या बाबत माहिती दिली. तसेच स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विचारावर आणि संकल्पना पूर्ण करीत संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी मुलांनी आपल्या आई- वडिलांना नमस्कार करून आषाढी एकादशी साजरी करावी अशी मुलांना सूचना विकासभाऊ गोरे यांनी केली. मुख्याधिपिका प्रमिला गोरे यांनी सर्व मुलांचे, शिक्षक यांचे अभिनंदन केले कौतुक केले. मुलांनी विठ्ठल, रुखुमाई, पांडुरंग, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी वेशभूषा परिधान करून, भजन, अभंग, कीर्तन अशा प्रकारे एकादशीच्यापूर्व दिवस निमित्त शाळेत पायी दिंडी सोहळा संपन्न झाला.

28
5154 views