logo

भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व संघटक पदी श्री. प्रसाद दादा घोरपडे यांची निवड

ठाणे: २० जून २०२५ रोजी भारतीय मराठा महासंघाचा रौप्यमहोत्सवी सोहळा ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात श्री. प्रसाद दादा घोरपडे यांची भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व संघटक पदी निवड करण्यात आली.
गेली दोन वर्षे श्री. प्रसाद दादा घोरपडे यांनी भारतीय मराठा महासंघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेऊन, महासंघाने त्यांना आता महाराष्ट्र राज्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
यावेळी बोलताना श्री. घोरपडे यांनी सांगितले की, "माझ्यावर सोपवलेल्या या दोन्ही पदांची जबाबदारी लक्षात घेऊन, मी संघटना वाढवण्यासाठी आणि संघटनेची बाजू जनतेसमोर भक्कमपणे मांडण्यासाठी कटिबद्ध आहे." त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे कार्य यशस्वीपणे पार पाडण्याची ग्वाही दिली.
या सोहळ्याला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब आहेर, भाजप आमदार श्री. निरंजन डावखरे, शिवसेना नवनिर्वाचित उपनेते व जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष श्री. निलेश सांबरे, ठाणे भाजप जिल्हा अध्यक्ष श्री. लेले यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(दत्तात्रय तुकाराम काळे, एक सामाजिक मीडिया कार्यकर्ता आणि एआयएमए मीडिया फाउंडेशनचा प्रतिनिधी आहे.)
बातमी देण्यासाठी संपर्क: ८०८००७६२६२

7
5729 views