logo

नियम मोडणाऱ्या रिक्षा वाहतूक शाखेत जमा...



चालकांना दंड : ३० हून अधिक रिक्षांवर कारवाई


जळगाव : कागदपत्र नसणे, गणवेश न

घालणे, प्रलंबित दंड यासह वेगवेगळ्या प्रकारे नियम भंग करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शनिवारी (दि.२१ जून) धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. शहर वाहतूक शाखेच्यावतीने ३० हून अधिक रिक्षांवर कारवाई करण्यात येऊन त्या वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, तसेच अपघात टाळण्यासाठी, गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेच्यावतीने वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली.

प्रत्येक भागातून रिक्षा जमा

शनिवारी पोलिस दलाने एकाचवेळी रेल्वे स्थानक परिसर, बसस्थानक, बेंडाळे चौक, प्रभाग चौक, इच्छादेवी चौक, नेहरू चौक, सुभाष चौक, तसेच आकाशवाणी चौक व इतर भागातून रिक्षा तपासणी मोहीम सुरू केली. यात वाहतुकीचे नियम भंग केल्याचे आढळून आल्याने ३०हून अधिक रिक्षांवर पोलिसांनी कारवाई करून त्या वाहतूक शाखेत जमा केल्या.

२ रिक्षा जमा केल्यानंतर चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. रिक्षाचालकाने काय नियम मोडला, दंड थकीत आहे का, यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी 3 संदीप गावित, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पवन देसले हेदेखील रस्त्यावर उतरले व कारवाईबाबत सूचना दिल्या.

1
299 views