logo

अपर पोलिस अधीक्षकांमार्फत उपनिरीक्षकांची विभागीय चौकशी...





जळगाव : पोलिस दलात असताना

कोणाशी संपर्कात असावे याचे भान न ठेवता वारंवार ड्रग्स पेडलरशी संपर्कात राहिल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांची विभागीय चौकशी केली जात आहे. अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव) यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत

आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

ड्रग्स प्रकरणात फरार असलेल्या संशयिताशी २५२ वेळा संपर्कात असल्याच्या कारणावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना पोलिस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले होते. त्यांची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर आता विभागीय चौकशी करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात देण्यात आले होते.

23
529 views