
महर्षी चित्रपट संस्थेच्या महर्षी लघुपट महोत्सवाला सुरुवात...
महर्षी चित्रपट संस्थेच्या महर्षी लघुपट महोत्सवाला सुरुवात...
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्य व जबाबदारी या विषयांवर तसेच पर्यावरण संवर्धन, संगोपन व जतन तसेच सामाजिक विषयांवर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या लघुपटांचे स्त्रीनिंग हुतात्मा स्मारक नाशिक येथे मा नितिन नेर उपायुक्त मनपा नाशिक व अभिनेत्री पूनम पाटिल यांच्या हस्ते चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून करण्यात आले..
आजपर्यंत जवळपास 600 लघुपट महर्षी फेस्टिवल मध्ये आले आहेत त्यात तीनशेच्या वर लघुपटांचे स्क्रिनिंग करण्यात आलेले आहे. त्यातील एकुण 70 लघुपटाना बक्षिसे देण्यात आली असे संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले..
प्रमुख पाहुणे मा मनपा उपायुक्त नितिन नेर यांनी सांगितले की, लघुपट जनतेत पोहोचण्याचे प्रभावी साधन हे आहे त्याचा वापर नागरिकांना केला पाहिजे यामुळे कमी वेळात चांगला संदेश देता येईल...
असे लघुपट महोत्सव होणे आवश्यक आहे यामुळे नवनवीन कलाकारांना आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येईल असे अभिनेत्री पूनम पाटिल यांनी आपले मत मांडले..
प्रमोद वाघचौरे यांनी शुभेच्छा देत आपले मत मांडले..
हा महोत्सव दोन दिवस चालणार आहे नागरिकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले..
सूत्रसंचालन किरण काळे यांनी केले तर आभार प्रा सोमनाथ मुठाळ यांनी केले..
स्पर्धेचे परीक्षण प्रा आकाश कंकाळ व योगेश गायकवाड यांनी केले..
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऍड अमोल घुगे, डॉ अजय कापडणीस, चंद्रकिरण सोनावणे, सुनिल परदेशी, श्वेता भामरे, विजया तांबट, भिला ठाकरे, संदिप नगरकर, जितेश पगारे, योगेश बर्वे, प्रमोद जांगड़ा, यशवंत लाकडे, आदींनी केले.