दुचाकीची धडक, तरुण जखमी....
जळगाव : एका भरधाव दुचाकीनेसमोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे सागर एकनाथ बारी (२९, रा. श्रीधर नगर) हे जखमी झाले. हा अपघात दि. ९ मे रोजी झाला. याप्रकरणी बारी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सत्यवान वारंगे करीत आहेत.