logo

दिवाळीआधी घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या ग्रा.पं.चा होणार सन्मान...



जळगाव : जिल्ह्यातील नागरिकांच्या

घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी जि.प. प्रशासनाकडून दिवाळीआधी घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी 'ही दिवाळी नवीन - घरी' या अभिनव उपक्रमाची घोषणा केली आहे.

या योजनेअंतर्गत दिवाळी पूर्वी म्हणजेच ३० सप्टेंबरपूर्वी घरकुलाचे बांधकामे पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ९० हजार घरकुलांचे काम सुरू आहे. त्यापैकी ७५ टक्के घरकुलांचे काम दिवाळीआधीच करण्याचा प्रयत्न जि.प. प्रशासनाकडून सुरू आहे. अनेकदा या कामांना काही तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागतो. त्यामुळे घरकुलांचे काम वेळेवर पूर्ण होत नाहीत. हे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

66

सर्वसामान्य नागरिकांसाठी 'घराची पूर्तता होणे हे एक स्वप्न असते, अनेकदा हे स्वप्न पूर्ण करताना, अनेक वर्षे मेहनत करावी लागते. तेव्हा अनेक नागरिकांना हक्काचे घर मिळते. पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जिल्ह्यात घरकुलांचे काम सुरू आहे. घरांचे स्वप्न

दिवाळीसारख्या चांगल्या सणाआधी पूर्ण झाले तर ते लाभार्थ्यांसाठी आनंदाची बाब ठरते. त्यामुळेच घरकुलांच्या कामांना वेग येण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी
अधिकारी, जि.प.

20
918 views