
गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मधील घटना
उपविभागीय कार्यालय आर.सी.पी प्रथम क्रमांक 1 ची कारवाई
पुसद– दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. परंतु या दरम्यान एका 21 वर्षे तरुणास गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस सह अटक केली आहे. सदरची कारवाई आरसीपी पथक क्रमांक 1 उपविभागीय कार्यालय पुसद यांनी केली आहे. सविस्तर वृत्त अशे की , काल दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पुसद शहर हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅली बंदोबस्तामध्ये असताना , पोलीस शिपाई नरेश नरवाडे व पराग गिरणाळे यास रात्री अंदाजे 8 ते 8.30 वाजताचे सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, एक पांढरा शर्ट , पांढरा पॅन्ट व लांब केस तसेच काळा सावळ्या रंगाचा असलेला तरुण स्वतःजवळ गावठी पिस्टल बाळगून न्यायालय परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन फिरत आहे. सदर माहिती RCP पथक प्रमुख उमेश देविदास राठोड यांना दिले असता , त्यांनी पथकासह न्यायालय परिसरात सापळा रचला असता , विद्यमान न्यायालयाच्या डाव्या गेट समोरील डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर माहिती मिळाल्याप्रमाणे त्याच वर्णनाचा एक इसम दिसून आला. त्यास सापळा रचून थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांची चाहूल लागल्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी आपल्या कला कौशल्याचा वापर करून त्यास जागीच पकडले. तरुणास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सलीम शेख इस्माईल वय 21 वर्ष रा. तुकाराम बापू वॉर्ड पुसद असे सांगितले. पोलिसांनी पंचा समक्ष कायदेशीररित्या त्याची अंगझडती घेतली असता , त्याचे कमरेकडील मागील बाजूस पॅन्ट मध्ये एक गावठी कट्टा ज्याचे वर्णन काळ्या व सिल्वर रंगाचा ज्याचे बटवर काळ्या रंगाचे प्लास्टिकचे कव्हर व त्यावर मध्यभागी दोन्ही बाजूने निळ्या रंगाचे प्लास्टिकचे स्टार , दोन्ही बाजूने चार स्क्रू सिल्वर रंगाचे , ज्याची बॅरल ची लांबी 6.2 इंच , बट ची लांबी 5 इंच अशी असून त्याची मॅक्झिन उघडून पाहिली असता त्यामध्ये , दोन जिवंत राऊंडची काडतूस असून प्रत्येक राऊंड ची लांबी 1 इंच अशी असल्याचे दिसून आले. सदर कट्ट्याची किंमत अंदाजे 25 हजार रुपये , व त्यामधील दोन जिवंत राऊंडची काडतूस किंमत अंदाजे 2 हजार रुपये असा एकूण 27000 चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी शस्त्र बाळगण्याची परवानगी बाबत त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नसल्याने सदरचे अग्निशस्त्र व जिवंत 2 काडतूस पंचासमक्ष जप्त करण्यात आले. अशा प्रकारची फिर्याद उमेश देविदास राठोड नेमणूक RCP पथक प्रमुख क्रमांक 1 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद यांनी दिली असून यातील आरोपी शेख सलीम शेख इस्माईल वय 21 वर्ष रा. तुकाराम बापू वार्ड पुसद याची विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 211/2025 शस्त्र अधिनियम 1959 ची कलम 3 , 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई RCP पथक क्रमांक एक मधील पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल उमेश राठोड , हेड कॉन्स्टेबल अभिजीत सांगळे , हेड कॉन्स्टेबल गजानन चव्हाण , पोलीस नाईक रोहिदास राठोड , संतोष सरकुंडे , पोलीस कॉन्स्टेबल नरेश नरवाडे , पराग गिरनाळे यांनी केली आहे.