logo

आईमा मीडिया pune29/3/2025 म्यानमार रात्री उशीरा पुन्हा भूकंपाने हादरले; आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू आईमा मीडिया पुणे :

आईमा मीडिया pune29/3/2025 म्यानमार रात्री उशीरा पुन्हा भूकंपाने हादरले; आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू
आईमा मीडिया पुणे : म्यानमारमध्ये पुन्हा एकदा रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. शुक्रवारी रात्री १२ वा. च्या सुमारास ४.२ तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. यापूर्वी म्यानमारमध्ये एकामागून एक चार भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज सकाळी ५.१६ वाजता अफगाणिस्तानात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा सर्वाधिक फटका थायलंडमधील बँकॉकला बसला आहे. शुक्रवारी भारत, बांगलादेश आणि चीनमध्ये ७.७ ते ४.२ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यात आतापर्यंत १५४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ज्यामध्ये म्यानमारमधील १४४ आणि थायलंडमधील १० लोकांचा समावेश आहे.
म्यानमार आणि थायलंड हे दोन्ही देश ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरले. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, बँकॉकमधील एक ३० मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्याच्या राड्यारोड्याखाली ९० मजूर गाडले गेले. म्यानमारमध्ये अनेक ठिकाणी या भूकंपात रस्ते उखडले गेले. दोन्ही देशांत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. म्यानमारमध्येही घरे आणि अपार्टमेंट कोसळल्या. त्यात १५४ जण मरण पावले. शेकडो लोक बेपत्ता आहेत. या भूकंपाचे हादरे कोलकात्यातही जाणवले. आतापर्यंत म्यानमारमध्ये १४४ मृतदेह सापडले तर थायलंडमध्ये १० मृतदेह सापडले. दोन्ही देशात मिळून सुमारे १२०० जणांवर उपचार सुरू होते. दोन्ही देशांच्या आपत्कालीन सेवेच्या अधिकाऱ्यांनी शेकडो जण मृत्युमुखी पडले असावेत, अशी भीती व्यक्त केली आहे.आणीबाणी जाहीर
या भूकंपामुळे थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी बँकॉकमध्ये आणीबाणी जाहीर केली. काही मेट्रो आणि लाईट रेल्वेसेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या, ज्यामुळे बँकॉकची वाहतूक व्यवस्था अधिक बिघडली.सकाळी ११:५० वाजता पहिला भूकंप
पहिला भूकंप सकाळी ११:५० वाजता झाला, त्याची तीव्रता ७.२ इतकी होती. यानंतर, दुसरा भूकंप दुपारी १२:०२ वाजता आला, त्याची तीव्रता ७ इतकी होती. त्यानंतर, प्रत्येकी एक तासाच्या अंतराने आणखी दोन भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, पहिल्या दोन भूकंपांचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होते, तर तिसरा भूकंप जमिनीखाली २२.५ किलोमीटर खोलीवर झाला.भारताने पाठवली मदत
एअर फोर्स स्टेशन हिंडन येथून आयएएफ सी १३० जे विमानाने म्यानमारला सुमारे १५ टन मदत साहित्य पाठवले आहे. ज्यामध्ये तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, तयार जेवण, पाणी शुद्धीकरण करणारे यंत्र, स्वच्छता किट, सौर दिवे, जनरेटर सेट, आवश्यक औषधे (पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युला, सिरिंज, हातमोजे, कापसाच्या पट्ट्या, इ.) यांचा समावेश आहे

0
0 views