गळ्यातील मंगळसूत्राची चोरी....
जळगाव : विरावली ते यावल दरम्यानबसमध्ये प्रवास करत असताना योगेश्वरी नारायण धनगर (वय-४५, रा. वड्री, ता. यावल) या शिक्षिकेच्या गळ्यातील ६४ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळपोत चोरून नेल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या संदर्भात १७ फेब्रुवारी रोजी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.