logo

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

पुणे जिल्हा परिषद सदस्या, एस बी पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे
या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (जागतिक गुंतवणूक परिषद)
दावोस येथे होणाऱ्या वार्षिक २०२५ च्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. २० ते २४ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी त्या उपस्थित राहणार आहेत.
जागतिक व्यापार, व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जगाच्या आणि एखाद्या प्रदेशाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं 1971 साली WEF ची स्थापना झाली होती. दरवर्षी या संस्थेतर्फे स्वित्झर्लंडच्या दावोस या नयनरम्य ठिकाणी एका परिषदेचं आयोजन केलं जातं.

एस.बी. पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा, ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर उपसमितीच्या मा.सहअध्यक्ष व इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लि.च्या संचालिका अंकिता पाटील ठाकरे आहेत.
अंकिता पाटील ठाकरे या उच्च विद्याविभूषित आहेतच व सर्वसामान्य व्यक्तींसाठी सर्व क्षेत्रात अगदी मनापासून कार्य करीत असून आज ग्रामीण भागातील युवती तसेच महिला आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेषता ग्रामीण भागातील युवतींना आपले स्वतःचे सामर्थ्य सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी एकत्रित आणण्याच्या दृष्टीने त्यांचे व्यक्तिमत्व एक अभिमानस्पद प्रेरणादायी असल्याचे दिसून येते. इस्माच्या व इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लि.च्या सहकार्याने त्या साखर कारखानदारीतील शेतकरी वर्गाविषयी न्याय हक्काने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) प्रसंगी देशासाठी व महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत.

1
248 views