logo

१८ हजार भारतीयांच्या हकालपट्टीची तयारी.?

मुंबई प्रतिनिधी..
वॉशिंग्टन : अमेरिकेची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्पचा कार्यक्रम सुरू, 18 हजार भारतीयांच्या हकालपट्टीची तयारी!
चार वर्षांनंतर पुनरागमन करत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. सोमवार 20 जानेवारी 2025 ला ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. शपथ घेताच ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे, ज्यामुळे भारतातून अवैधरित्या अमेरिकेत गेलेल्यांवर टांगती तलवार आहे.
अमेरिका-मॅक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाईल. अवैध प्रवास तातडीने रोखला जाईल आणि लाखो अवैध प्रवाशांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल’, असं डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतल्यानंतर म्हणाले होते. यानंतर अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या प्रवाशांवर टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावर भारत सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीयांनी जगाच्या कोपऱ्यात कुठेही राहिलं तरी तिथले नियम आणि कायद्याचं पालन करावं, अशी भूमिका भारताने स्पष्ट केली आहे.

6
690 views