logo

शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी या गावात आखेर बिबट्या जेलबंद करण्यात यश आलेच....

पिंपळसुट्टी येथे अखेर बिबटया जेरबंद
शिरूर प्रतिनिधी - रमेश बनसोडे
ता ७. पिंपळसुट्टी ता. शिरूर जि. पुणे येथे मागील महिन्यामध्ये या लहान मुलीवर अचानक अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलीवर झडप घातली.चार वर्षाच्या रक्षा अजय निकम या मुलीला घोडनदी किनाऱ्यावर ग्रामपंचायत गायरान हद्दीतील वसलेली भिल्लवस्ती या परिसरातून बिबट्याने नेले.यामध्ये रक्षा बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावली. मी स्वतः हा पत्रकार - रमेश बनसोडे त्यांच्या घरी जाऊन सखल चौकशी करून बातमी मधून न्याय देण्याचे काम केले.यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते ,या घटनेची तातडीने दखल जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते साहेब ,सहाय्यक उपवनसंरक्षक अमृत शिंदे साहेब, डोईफोडे साहेब,भोसलेसाहेब यांनी कुटुंबाला दिलासा म्हणून तातडीने दहा लाखाची मदत दिली आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जवळपास १६ पिंजरे व ट्रॅप लावले होते ,या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास त्यांच्या टीमला यश आले .तसेच पिंपळसुट्टीचे सरपंच निर्मलाताई सुनील फलके, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब खळदकर, फत्तेसिंग वाबळे चेअरमन शरदचंद्र वि का सोसायटी,शशिकांत वेताळ मा. संचालक घोडगंगा साखर कारखाना ,मा.सरपंच नानासाहेब फलके, मा सरपंच नितीन फलके आदी ग्रामस्थांनी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते साहेब व त्यांचे टीमचे आभार मानले.

3
753 views