‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा
नवी दिली, दि.७ ः येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद, मुंबई येथील राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आणि गणित दिनानिमित्त तीन दिवशीय स्पर्धात्मक उपक्रम पार पडले. दि. २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलामध्ये पब्लिक अवरनेस कार्यक्रम आणि फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम यासह विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २८ डिसेंबर रोजी गणितीयशास्त्र संकुलातर्फे पेनिसिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणित विषयाचे जीवनातील महत्त्व सांगून गणित विषयाबाबत जनजागृती करण्यात आली. दि. ३० डिसेंबर रोजी फॅक्लटी ट्रेनिंग अंतर्गत गणिता मधील ‘ॲडव्हान्स टेक्निकल मेथड’ या विषयावर व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड आणि शिक्षण अधिकारी माधव सलगिरे यांची उपस्थिती होती. दि. ३१ डिसेंबर रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा पोस्टर सादरीकरण आणि गणितीय मॉडेल या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास सहसंचालक डॉ. के. एल. बोंदार आणि कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांची विशेष उपस्थिती होती.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूलने पटकावला. यामध्ये पृथ्वीराज देशमुख, कृष्णा पुंड, तन्वी राठोड, गौरी गाडेगावकर इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. दुसरा क्रमांक लातूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने पटकावला. यामध्ये प्रणव सोमवंशी, आयुष ठोंबरे, विराज साबळे, शुभम केंद्रे हे विद्यार्थी सहभागी होते. तिसरा क्रमांक परभणी येथील देवगिरी ग्लोबल अकॅडमी स्कूलने पटकावला. यामध्ये अद्वत लोळगे जान्हवी मनोजकुमार, सिद्धी दीक्षित, नैतिक लटपटे इत्यादी विद्यार्थी सहभागी होते. पदवीधरामधून पोस्टर सादरीकरण मध्ये पहिला क्रमांक उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील स्नेहा बिराजदार यांनी पटकावला. आणि दुसरा क्रमांक याच महाविद्यालयातील अरुण मनोहर यांनी पटकावला. तिसरा क्रमांक लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील विश्वजीत नतू यांना मिळाला. पदव्युत्तर पोस्टर सादरीकरणमध्ये गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठामधील प्रीतीरंजन गिरी यांना पहिला क्रमांक मिळाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामतील योगेंद्र मुळे यांना दुसरा क्रमांक मिळाला. तर गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठातील श्रीलक्ष्मी भाविरी यांना तिसरा क्रमांक मिळाला .
गणितीय मॉडेल तयार करण्यामध्ये लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल मधील ओजेस पाळंगे यांचा पहिला क्रमांक आला तर दुसऱ्या क्रमांकासाठी परभणी येथील गांधी महाविद्यालयातील यशश्राज चोपडे व श्रेया मोरे यांना मिळाला. तिसरा क्रमांक नांदेड येथील इंदिरा गांधी हायस्कूलची प्रियंका किरवले व प्रिया गाडगीळ यांना मिळाला.
या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. रूपाली जैन, डॉ. अनिकेत मुळे, डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. उषा सांगळे, डॉ. दिव्यावीर यांनी विशेष परिश्रम घेतले.