logo

सुनील महाजन यांचे तिन्ही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले....


जळगाव : शहराला पाणीपुरवठा
करणाऱ्या जुन्या पाइपलाइनचे पाइप चोरी प्रकरणी दोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी महाजन यांच्यासह इतर संशयितांच्या जामीन अर्जावर न्यायालयात कामकाज • झाले. त्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी दिली.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या लाईनच्या पाईप चोरी प्रकरणी मनपा माजी विरोधीपक्ष नेते सुनिल सुपडू महाजन यांच्यासह सात जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात एक तर जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दोन असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी

आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. उर्वरीत मात्र अद्याप फरार आहे. मुख्य संशयित सुनील महाजन यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पुर्ण झाला. न्या. बी.एस.वावरे यांनी युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सोमवारी महाजन यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तर या प्रकरणी अटकेत असलेले भावेश पाटील, सादीक खाटीक व कुंदन पाटील यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती अॅड. जैनोद्दीन शेख यांनी दिली. सुनील महाजन यांच्या जळगाव तालुका पोलिस स्टेशनमधील दाखल एका गुन्ह्यात अॅड. जैनोद्दीन शेख यांनी तर तालुका व रामानंदनगर पोलिस ठाण्यातील एक गुन्ह्यासाठी अॅड. सागर चित्रे यांनी तर सरकारी वकील म्हणून सरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

69
2023 views