महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला
नांदेड : लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ.संतूकराव हंबर्डे आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंदराव बोंढारकर यांच्या प्रचाराचा नारळ काळेश्वर मंदिर येथे दिनांक ४ नोव्हेंबर रोजी फोडण्यात आला .
यावेळी खा.अजित गोपछडे, माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील, लोकसभेचे भाजपाची उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव बोंढारकर ,प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे ,बाळू खोमणे, डॉक्टर कालिदास मोरे ,दीपक ठाकूर ,राजू गोरे, जीवन घोगरे पाटील , मोतीराम पाटील मोरे , दत्ता पईतवार, डॉक्टर अमोल ढगे ,डॉक्टर शितल बालके, वैजनाथ देशमुख ,बिल्लू यादव ,दिलीप ठाकूर, उद्धव शिंदे, तुलजेश यादव , प्रा. कैलास राठोड, शंकर पिनोजी, अशोक मोरे, सुहास खराडे पाटील ,शितल खांडील ,अभिषेक सौदे, मारुती धुमाळ ,साहेब विभूते ,बजरंग सिंग ठाकूर ,अनिल व्यास ,श्रीनिवास बंडेवार ,गीता ताई पुरोहित ,वनमाला राठोड, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंदराव बोंढारकर यांच्या प्रचाराचा नारळ काळेश्वर मंदिर येथे फोडल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील हे म्हणाले की , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात खऱ्या अर्थाने विकासाची वाटचाल सुरू आहे . मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत खासदार असताना दिल्लीमधून विकासाचा एकही निधी मिळत नव्हता परंतु ज्या वेळेस मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत खऱ्या शिवसेनेत गेलो त्यावेळी हिंगोलीच्या विकासासाठी भरपूर निधी मिळाला आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार येणार हे अटळ आहे . त्यामुळे कोणत्याही विचारात न अडकता आणि मताची विभागणी न होऊ देता , नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसभेला कमळ या निशाणी समोरील बटन दाबा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी धनुष्यबान या चिन्हासमोरील बटन दाबून डॉ. संतुकराव हंबर्डे यांना खासदार म्हणून तर आनंदराव बोंढारकर यांना आमदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मला आमदार म्हणून काम करण्याची आपण संधी दिला होतात. दरम्यानच्या काळात मी खासदार म्हणून हिंगोलीला गेल्यामुळे पाच वर्षे आपला संपर्क दुरावला होता परंतु आता सहा वर्षासाठी आमदार म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे . इथून पुढे आपले सर्व स्नेह संबंध कायम राहतील त्यासाठी आनंदराव बोंढारकर यांना विधानसभेत पाठवा अशी आग्रही विनंती ही हेमंत पाटील यांनी केली.
भाजपाची राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यावेळी बोलताना म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची मान जगभरात अभिमानाने उंचावली आहे . शेतकऱ्यांपासून शेतमजुरा पर्यंत विधवा महीलांपासून तर सर्व घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने भरपूर योजना राबविले आहेत . तरीही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवाल्यांनी भाजपाचे सरकार आल्यास संविधान बदलेल , आरक्षण धोक्यात येईल असा खोटा अपप्रचार केला. मताची विभागणी झाली. विशेष वर्गाने काँग्रेसला एक गठामते केले परंतु हिंदू धर्मातील बहुसंख्य मतदार मतदानासाठी बाहेर पडला नाही परिणामी ज्यांच्या खांद्यावर हिंदू धर्म रक्षणाची जबाबदारी आहे त्या मोदींना आणि भाजपाला कमी जागा मिळाल्या हे दुःख भरून काढण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे. पण होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त हंबर्डे यांच्या कमळ या निशाणी समोरिल बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. राज्यात सुरू असलेले महायुतीचे सरकार कायम ठेवून राज्याचे विकासाची खरी पायाभरणी करण्यासाठी महायुतीचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव बोंढाराकर यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरिल बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या घरातील मी एक तरुण आहे. शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्यानंतर आजपर्यंत तो कधीही खाली ठेवला नाही . हिंदुत्व आणि शिवसेना हा माझा श्वास आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या विकासासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे धनुष्यबाण या निशाणीवर मी निवडणूक लढत आहे. आपण सर्व मतदार मायबाप मला आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्यासाठी आमदार म्हणून निवडून द्याल अशी अपेक्षा नांदेड दक्षिण मध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी व्यक्त केली.