logo

जळगाव येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पवार प्रचारार्थ मा.पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी घेतला विरोधाकाचा समाचार....!

जळगाव जिल्हाध्यक्ष Aima media:-
जळगाव येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पवार प्रचारार्थ मा.पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी विरोधाकाचा समाचार घेतला.

जळगाव लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पाटील-पवार ह्यांच्या प्रचारार्थ जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली.

"तमाम देशभक्तांनी हातात मशाल घेतली असून, आता दिल्लीची हुकूमशाही जाळायला जनता तयार आहे, ह्याची ग्वाही देणारी ही सभा होती. ह्या सभेत एकच नारा घुमला, तो म्हणजे "लोकशाही रक्षणाचा".

आम्ही दिल्लीकरांना गुडघ्यावर आणतोय. छत्रपती शिवाजी महाराजाची , आम्ही शपथ घेतलीय; तुमच्या स्वाभिमानाला आम्ही कलंक लागू देणार नाही, असा एल्गार पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केला.

सभेला माजी खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, माजी महापौर जयश्रीताई महाजन, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे तसेच इंडिया - महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

0
163 views