logo

जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा धोत्रा भनगोजी, शाळेला मिळाली *विज्ञान व टेकनॉलॉजि व इंनोव्हशन सेंटर लॅब! विज्ञान व तंत्रज्ञान यांचे शिक्षण व मार्गदर्शन मिळणार.

मन्सूर शहा आयमा न्यूज (चिखली बुलढाणा):---- दिनांक 1 मे 2024
महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा प्रकल्पा अंतर्गत *रियल स्टार एज्युकेशन* यांचे मार्फत जि प मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा धोत्रा भनगोजी, शाळेला मिळाली *विज्ञान व टेकनॉलॉजि व इंनोव्हशन सेंटर लॅब* त्यामुळे मुलांना विज्ञान व तंत्रज्ञान या विषयी वेगवेगळे प्रयोग करण्यास संधी आपल्या शाळेत उपलब्ध झाली आहे. दिवसेंदिवस शाळेत गुणवत्ता पूर्ण अध्ययना बरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान यांचे सुद्धा दर्जेदार शिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे. शाळेच्या गुणवत्ते मुळे परिसरातील, पळसखेड सपकाळ, शेलसूर, आंधई, उतरादा, पेठ, इत्यादी गावच्या पालकांचा व विध्यार्थ्यांचा ओढा आपल्या शाळेकडे वाढत आहे. त्यामुळे पालकांच्या व विध्यार्थी यांच्या अपेक्षा शाळेकडून वाढल्या आहेत. आणि आम्ही सुद्धा उत्कृष्ट व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहोत.NMMS, नवोदय, शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शन शाळेत केल्या जाते त्यामुळे आजच आपल्या पाल्याच्या प्रवेश तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या जि प मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा धोत्रा भनगोजी येथेच सुनिश्चित करा. असे शाळा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

12
2104 views