logo

अधिकार नसतांना ए.सी. बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई...


अहमदनगर: अधिकार नसतांना आपल्या दालनात अनेक शासकीय अधिकारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत एअर कंडीशनर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश नाशिक विभागाचे सामान्य प्रशासन उपायुक्त रमेश काळे यांनी दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल सादर करावा, असे देखील नमुद केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा आरटीआय कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी एअर कंडीशनर बसविण्याच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तक्रार ई केली आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील बहतांश अधिकाऱ्यांनी बर अधिकार नसतांना आपल्या दालनांमध्ये एसी बसविले असल्याची बाबत उघडकीस आणली आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला अधिकार नसतांना एअर कंडीशनर बसविले आहेत. त्यांच्यावर कारवाई मागणी देखील दिपक पाचपुते केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक विभागाचे सामान्य प्रशासन उपायुक्त रमेश काळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त महानगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ,प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक कार्यकारी अभियंता महावितरण यांना सर्वांना आपल्या कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांनी अधिकार नसतांना ए. सी. बसविले असतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की,

ज्या अधिकाऱ्यांच्या वेतनस्तर एस-३० १४४२००-२१८२०० पेक्षा कमी आहे, अशा अधिकारी यांना एअरकंडीशनर त्यांचे दालनात बसविता येत नाही, अशी तक्रार प्राप्त झाली आहे. तरी आपल्या कार्यालयातील काही अधिकारी यांनी एअर कंडीशनर बसविले असतील तर, त्यांच्यावर शासन निर्णय दि. २५ मे २०२२ अन्वये योग्य ती कार्यवाई करण्यात यावी.

त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी अहमदनगर व त्यांचे अधिनस्त कार्यरत अधिकारी यांनी शा.नि.क्र. शाकाजा-१०२२/प्र.क्र.१३/२२ दि.२५ मे २०२२ चे तंतोतंत पालन करावे ही विनंती. तसेच शासन निर्णयान्वये योग्य ती कार्यवाही केलेबाबत अर्जदार यांना आपले स्तरावरुन कळविण्यात यावे असे नाशिक उपायुक्त रमेश काळे यांचे जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य प्राधिकरणाला आदेश

0
0 views