logo

महाविकास आघाडीचे अकोला मतदारसंघाचे उमेदवार डॉ अभय पाटील यांचा विजय निश्चित

अकोला मतदारसंघात डॉ. अभय पाटील यांचा विजय हो निश्चित..?*

💥 मविआची प्रचारात आघाडी*

महेंद्र महाजन

वाशिम : अकोल लोकसभा मतदारसंघातील महा विकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ महा विकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून, आघाडीची ध्येयधोरणे, विचारधारा अखेरच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत आहेत. परिणामी डॉ.पाटील यांच्या विजयाचे पारडे दिवसागणिक जड होत चालले असल्याचे राजकीय तज्ञ बोलत आहेत.निर्भीड आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व असलेले डॉ.अभय पाटील हे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तरुणाईंच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे आपसूकच त्यांच्या प्रचार कार्यात तरुण मंडळीचा विशेष सहभाग पाहावयास मिळत आहे. कारण त्यांच्या प्रचार कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या बहुतांश तरुणांच्या मुखातून एकच शेरोशायरी संपूर्ण मतदारसंघात घुमातांना ऐकू येत आहे.
हार कर भी वो हारते नहीं,
जो हृदय के उत्साह को मारते नहीं,
डॉ.पाटील की जीत निश्चित है,
क्यूँकी, वो मुसीबत से कभी डरते नहीं..!
तरुणाईचा हा उत्साह आणि महा विकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारात घेतलेली आघाडी अकोला लोकसभा मतदारसंघात यावेळेस परिवर्तन घडविणार असल्याचे मत सर्व सामान्य जनतेच्या तोंडातून बाहेर पडत आहे. तर काही राजकीय विश्लेषक सांगतात की, ज्या वेळेस संपूर्ण देशात काँगेस विरोधी लाट होती. त्यावेळेस अकोला हा काँग्रेसचा बालेकिल्ला नाविलाजस्तव भाजपच्या ताब्यात गेला होता. परंतू गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने हुकूशाही धोरण अवलंबिले आहे. परिणामी सर्व सामान्यांच्या मनात भाजपा विषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आपसूकच २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपा विरोधी लाट निर्माण झाली आहे. म्हणुन केवळ अकोल्यातच नव्हे; तर संपूर्ण राज्यात भाजपचा सफाया होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तद्वतच यावेळेस महा विकास आघाडीने वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत अस्थि रोग तज्ञ डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे काँगेसचा पूर्वाश्रमीचा बालेकिल्ला असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले डॉ. अभय पाटील हे केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे; तर विविध धार्मिक, सामाजिक कार्यात सदैव तन, मन, धनाने सहभागी होत असतात. त्यामुळे ते सर्वच क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ओळखले जातात. परखड व जे आहे ते तोंडावर बोलणे, कुणाचीही माघारी कुचेष्टा, निंदा,नालस्ती न करणे हा त्यांचा स्थायी स्वभावच त्यांच्या लोकप्रियतेचा खरा आधारस्तंभ असल्याचे त्यांच्या सानिध्यातील अनेकजण सांगतात.डॉ. अभय पाटील यांचे वडील डॉ. काशिनाथ पाटील हे विदर्भातील पाहिले अस्थि रोग तज्ञ होते. वडिलोपार्जित गडगंज संपत्ती, स्वतः उच्चविद्याविभूषित असून त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सौ. रेखा अभय पाटील ह्या सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे आपसूकच त्यांच्याकडे धन,दौलत, ऐश्वर्य असतांनाही त्यांनी लोक सेवेची व्याप्ती वाढावी म्हणुन राजकारणात प्रवेश केला आहे. त्यासाठी डॉ. पाटील यांनी अकोट, अकोला पासुन मतदार संघातील रिसोड तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत अख्खा मतदार संघ पिंजून काढला आहे. परिणामी त्यांचे प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनात आपुलकीचे नाते जुळले आहे. म्हणूनच आज प्रत्येक मतदाराच्या मुखातून डॉ. अभय पाटील यांच्या माध्यमातून अकोला लोकसभा मतदारसंघात महा विकास आघाडीचाच जय हो..! होणार असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.


*रिसोड-मालेगाव मधुन मोठ्या फरकाने आघाडी घेणार.*
रिसोड - मालेगाव विधानसभा मतदार संघात काही अपवाद वगळता, पाहिल्यापासूनच झनक घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित आहे. आणि त्याच घराण्यातील विद्यमान आमदार अमित सुभाषराव झनक हे आपल्या घराण्याची जनसेवेची परंपरा आजही टिकवून आहेत.काँग्रेसचा अभेद्य गड म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघात स्वतः आ. अमित झनक डॉ. अभय पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत असल्यामुळे येथून डॉ. पाटील यांना मोठ्या फरकाने आघाडी मिळणार असल्याचे सर्व सामान्य मतदार बोलत आहेत.

वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून

*रुग्ण सेवेसोबतच समाजसेवा घडावी हाच मूळ उद्देश. ___ डॉ. अभय पाटील.*
रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य असणारं वैद्यकीय क्षेत्र हाताशी असताना राजकारणाकडे कसे वळलात ? हा प्रश्न उपस्थित केला असता,डॉ. अभय पाटील म्हणाले की, रुग्णसेवा करत असताना मी रुग्ण व त्यांच्या सोबत येणाऱ्या कुटुंबीयांसोबत आस्थेने बोलत असतो. त्यामुळे अनेक गोष्टी लक्षात आल्या. रुग्णांना केवळ शारीरिक समस्या नसून, मानसिक, आथिर्क, सामाजिक अशा विविध समस्या आहेत की ज्या केवळ वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून सुटू शकत नाहीत. त्यासाठी एक कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी होणे गरजेचे आहे. तेंव्हा कुठे समाजसेवा करण्यास मोठा वाव मिळेल. आणि हाच मूळ उद्देश समोर ठेवून मी राजकारणात प्रवेश केला आहे.

98
11433 views