logo

अमडापूरचे सहा. पोलीस उपनिरिक्षक किसन गायकवाड यांची रेल्वेखाली आत्महत्या.



मन्सूर शहा आयमा न्यूज (चिखली बुलढाणा) : ---येथील रेल्वे
पटरीवर सहाययक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.
चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशनला सहाययक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले किसन लक्ष्मण गायकवाड वय ५६ रा. जाफराबाद रोड चिखली यांना अमडापूर पोलीस ठाण्यातून वर्धा येथे १७ एप्रिल रोजी असलेल्या व्हीआयपी बंदोबस्त करिता १६ एप्रिल रोजी सोडण्यात आले होते. परंतु तेथे न जाता त्यांनी शेगाव येथे बंद असलेल्या रेल्वे गेटजवळ
किलोमीटर नंबर ५४७ जवळ डाऊन मार्गावर असलेल्या ओखा - पुरी २०८२० या रेल्वेखाली १८ एप्रिल रोजी उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या झाल्याचे समजताच रेल्वे पोलीस ठाणेदार पंढरीनाथ मगर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत उचित कारवाई केली तर प्रेत पोस्टमार्टम करिता रुग्णालयात पाठविले होते. रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून सहाययक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेल्या अधिकाऱ्याने शेगाव येथे आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून या अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप कळलेले नाही.

19
1930 views