logo

एक वर्ष 11 महिने वयाच्या मुलीला मिळाले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान


आज कालच्या धावपळीच्या युगात आपल्या मुलांना शिक्षणासह जगात घडणाऱ्या वेग वेगळ्या गोष्टी बद्दल ज्ञान देणे व त्यांना विशिष्ट पद्धतीने घडविणे हे आजकाल आई-वडिलांचे कर्तव्य झाले आहे याच हेतूने आपल्या मुलांना सर्व प्रकारचे ज्ञान अवगत करण्याचे काम आई-वडील करत असतात त्यामध्ये आज धावपळीच्या युगामध्ये काही आई-वडील आपल्या मुलांच्या कला कौशल्या वरती विशेष लक्ष देतात तर काही व आई-वडील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यातीलच एक विशेष बाब म्हणजे पान्हेरा खेडी येथील रहिवाशी तसेच पुना येथे स्थायिक झालेले शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांची नात कु.अनया अश्विनी आशिष वैराळकर हिला इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड मिळाला असून अनया हीचे वय 1 वर्ष 11 महिने आहे. या वयात ती 11 फळांची नावे, 6 भाज्यांची नावे 10 प्राण्याची नावे, 6 देशांच्या ध्वजाची नावे, 6 पक्ष्यांची नावे तसेच सगळे फ्लॅश कार्ड दाखवल्या नंतर त्यांची सुद्धा नावे सांगते. यासह ती 1 ते 10 अंकमोजणी करते तसेच 5 प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करणे 1 मराठी आणि 3 हिंदी कविता म्हणते, ती 1 मराठी आणि 3 संस्कृत मंत्र सुद्धा म्हणते. 22 फेब्रुवारी 2024 रोजी तिच्या या प्रयत्नांची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून त्यांच्या कडून तिला IBR अचीवर प्रमाण पत्र व मेडल सुद्धा मिळाले आहे. अनया हिच्या कौशल्याचे व तिच्या ज्ञानाचे सर्वत्र कौतुक होत असून तिला मिळालेल्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोदी बद्दल तिच्या आजी-आजोबांचे व आई-वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

3
1445 views