logo

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनदर्शन काव्यातून अधोरेखित ....

नांदेड। येथील प्रा.अशोककुमार दवणे यांनी १ जानेवारी २०२१ रोजी एक संकल्प केला होता २०२१ या वर्षामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीनवावरील २०२१ कवींच्या २०२१ कवितांचा २०८४ पानांचा महाकाव्यग्रंथ तयार करुन १४ एप्रिल २०२१ रोजी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार होते परंतु कोरोना महामारीमुळे वरील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

आज दि.२० ऑक्टोबर २०२१ रोजी या काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू मा. प्रा.ई.वायुनंदन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्त विद्यापिठाच्या दालनात संपन्न झाला.आजच्या दिवशी वरील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ११ विद्यापिठात व सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला.या महाकाव्यग्रंथात नाशिक जिल्ह्यातील ७४ कवींच्या कवितांचा समावेश आहे.वरील कार्यक्रमासाठी प्रमूख अतिथी म्हणून सुनिल बर्वे, प्रा.गंगाधर अहिरे,बापूसाहेब सोनवणे,प्रा. स्वप्निल गरुड,गणेश पवार,उमा परदेशी,अरुण घोडेराव,भावना सोनवणे, आदिती सोनवणे,जेष्ठ पत्रकार प्रविण नेटावणे व जितेंद्र नरवडे उपस्थित होते.

25
14646 views
  
19 shares