logo

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस की लीडर शिप पार्थ अजित पवार करे, युवा नेताओ की मांग !!!


चिंचवड।
एकेकाळी 15 वर्ष सत्ता स्थापन करून शहराचा भरघोस विकास करणारी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटतट ऐन महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फटका  पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांना बसण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना बरोबर घेऊन निवडणूकीचा मास्टर प्लॅन तयार करणे गरजेचे बनले आहे.

 त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात आता सर्वांना सोबत घेवून जाणाऱ्या नव्या चेहऱ्याला संधी देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमात्ताने शहरातील गटतट पुन्हा एकदा पहायला मिळाले. सध्यस्थितीला पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,ज्येष्ठ नेते विलास लांडे,आझमभाई पानसरे, हनुमंत गावडे असे चार-पाच गट निर्माण झाले आहेत. स्वर्गीय विद्यमान नगरसेवक दत्ता काका साने निधनानंतर जनतेसाठी आक्रमक भूमिका मांडणारा विरोधी पक्षनेता पाहायला मिळत नाही हे सर्व जण जाणून आहेत.

 मात्र यामध्ये प्रत्येकजण संकूचितपणे विचार करीत आहे. पक्ष संघटनेचा आणि नियोजनाचा पुरता बट्टयाबोळ उडाला आहे. पक्षाच्या नेत्यांमध्ये ‘मी’ पणा वाढला असून, कसलीही एकवाक्यता दिसत नाही.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी आलेल्या युवा कार्यकर्त्याना जाणूनबुजून भेटी पासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप युवा कार्यकर्त्यांनी केला आहे.


परिणामी, राष्ट्रवादीवर मनापासून प्रेम करणारा नवोदित युवा कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा डाव असल्याचा संशय निर्माण झाला असून, कुणासोबत भावी राजकीय वाटचाल करावी, असा संभ्रम निर्माण आहे. 

युवा नेते पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता पिंपरी-चिंचवडमध्ये जनाश्रय मिळत आहे. पण, त्यांच्याकडे नवोदित कार्यकर्त्यांची तगडी फळी नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी आता पिंपरी चिंचवड शहरात नव्या कार्यकर्त्यांना  सोबत घेवून पक्षसंघटना मजबूत करतील आणि आपल्या नेतृत्वाचा करिश्मा दाखवतील, अशी अपेक्षा युवा नेत्यांनी व्यक्त केली आहे. 

मध्यंतरी, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शहराचा दौरा केला. त्यावेळी 50 नगरसेवक निवडून येतील आणि शिवसेनेचा महापौर होईल, अशी जाहीर घोषणा केली होती. शहरात शिवसेनेने पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहे. राष्ट्रीय काँग्रेस ने देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढणार अशी चर्चा आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी ताकद असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटा-तटाच्या राजकारणात व्यस्त आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत युवा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे महत्त्वाचे आहे. या प्रमुख समस्येकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष द्यायला वेळ नाही, अशी स्थिती  निर्माण असल्यामुळे नवोदित कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होत आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात आता पार्थ पवार यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन नवीन युवा पिढीला सर्व सामान्य जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी सोबत घेऊन प्रयत्न केले पाहिजे.

पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ला मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये युवा कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

9
14689 views