अंबरनाथ: सिंग हॉस्पिटलजवळील गटार काम अडचणीत
अंबरनाथ: उलन चाळ सिंग हॉस्पिटलच्या बाजूला गटार खोदून ठेवल् आहे. एक महिना उलटला असूनही काम पूर्ण झालेलं नाही. पावसाळा जवळ येत असून सिंग हॉस्पिटलच्या समोर पाणी साचण्याची समस्या भासत आहे.
स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे की, काही रुग्ण औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येताना गटारात पडल्यास कोण जबाबदार ठरेल. काम लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.