logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सालेभट्टीजवळ भीषण अपघात प्रवासी बस पलटली


🚨
गडचिरोली जिल्ह्यात मोठा अपघात — सालेभट्टीजवळ प्रवासी बस पलटी, भाजप पदाधिकाऱ्यांनी दाखवली मानवता
📍 गडचिरोली | मानपूरहून गडचिरोलीकडे येणारी एक प्रवासी बस सालेभट्टीच्या पुढे अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरडा सुरू झाला. बसमध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह अनेक प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बसचा अचानक ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघात होताच परिसरातील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच धानोरा परिसरात मदत आणि बचावकार्याला वेग आला. भारतीय जनता पार्टी धानोरा यांच्या वतीने तात्काळ ॲम्ब्युलन्स पाठविण्यात आली, ज्यामुळे जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल करता आले. भाजप तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, नगरसेवक मलिक भाऊ बुधवानी आणि सुभाष भाऊ धाईत यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले.
भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना प्राथमिक उपचार देत धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या कठीण प्रसंगी भाजप पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांनी दाखवलेल्या तत्पर मदतकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वेळेत मदत आणि ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाल्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
🎤 न्यूज रिपोर्टर : राजकुमार माहवे, गडचिरोली

409
20930 views

Comment