logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बकरी ईद पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये पोलिसांचा रूट मार्च व जमाव विसर्जन सराव...

📍 जामखेड पोलीस स्टेशन
जामखेड शहरात आगामी बकरी ईद तसेच इतर धार्मिक व सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 23 मे 2026 रोजी जामखेड पोलिसांच्या वतीने शहरात रूट मार्च तसेच जमाव विसर्जनाचा सराव घेण्यात आला.
सकाळी 10.30 ते 11.10 वाजेदरम्यान शहरातील संवेदनशील तसेच गर्दीच्या भागातून रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये जामखेड पोलीस स्टेशन, बीड कॉर्नर, जय हिंद चौक, मेन पेठ, खर्डा तापनेश्वर रोड, नूरानी कॉलनी आणि सदाफुले वस्ती या परिसरांचा समावेश करण्यात आला होता. पोलिसांच्या या मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कोणत्याही अनुचित प्रकाराला कठोर प्रतिसाद दिला जाईल, असा संदेश प्रशासनाने दिला.
त्यानंतर सकाळी 11.20 ते 11.55 वाजेदरम्यान जामखेड बस स्थानक येथे जमाव विसर्जनाचा प्रत्यक्ष सराव घेण्यात आला. या सरावामध्ये पोलिसांनी विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक दाखविले. सरावादरम्यान 5 सेल, 2 हँडग्रेनेड आणि 3 ब्लँक राऊंडचा वापर करण्यात आला.
या मोहिमेमध्ये पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली API जाधव मॅडम, PSI गावडे तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे 15 पोलीस अंमलदार व होमगार्ड सहभागी झाले होते. तसेच कर्जत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिरसाठ व त्यांच्यासोबत 5 पोलीस अंमलदार, मिरजगाव पोलीस स्टेशनचे 4 होमगार्ड, खर्डा पोलीस स्टेशनचे 5 पोलीस अंमलदार यांनीही सहभाग घेतला.
याशिवाय पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथील DI नितीन मोरे आणि DI मंगेश दाभाडे यांच्या उपस्थितीत हा सराव पार पडला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
सदर रूट मार्च व जमाव विसर्जन सरावाबाबत सोशल मीडिया तसेच पत्रकार माध्यमांना माहिती देण्यात आली असून आगामी उत्सव काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

4
1616 views

Comment