कोराडी व खापरखेडा विद्युत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर युनियनची बैठक
कोराडी: वंचित श्रमिक कामगार युनियनने कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आणि विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी २३ मे २०२६ रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
कोराडी मेन रोडवरील युनियनच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती यशस्वी ठरली.ही बैठक युनियनचे मुख्य सल्लागार सी.सी. वासे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली. बैठकीला युनियनचे अध्यक्ष प्रदीप काळे, संघटक नीलकमल बोरकर, जनसंपर्क अधिकारी विशाल सोनवणे, आशिष मेश्राम यांच्यासह विविध विभागांतील कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी युनियन आगामी काळात तीव्र संघर्ष करेल, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.