*वळदगावात महिलेला चाकू लावून सव्वादोन लाखांचा ऐवज लुटला...*
*वळदगावात महिलेला चाकू लावून सव्वादोन लाखांचा ऐवज लुटला...*
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर तालुक्यातील वळगाव येथे घरात घुसून महिलेला चाकू लावून तब्बल सव्वादोन लाखांचे दागिने व रोकड चोरून नेण्याचा खळबळजनक प्रकार काल रात्री साडेआठच्या सुमारास घडला.
वळदगाव येथील गोपाळे वस्ती येथे राहणाऱ्या मेघा गोरख नवगिरे या आपल्या मुलासह घरी जेवण करत असताना रात्री साडेआठच्या सुमाराचा अचानकपणे घराच्या मागच्या दरवाजाने तोंडाला मास्क लावलेले तिघे लुटारू घरात घुसले आणि त्यांनी मेघा नवगिरे यांच्या गळ्याला चाकू लावून खाली पाडून गळ्यातील पोत तोडून घेतली.त्यानंतर बंदुकीसारखे हत्यार दाखवून घरातील सोन्याचे दागिने काढून दे असे म्हणत कपाट उघडायला लावून कपाटातील सोन्याचे गंठण, नेकलेस, झुबे तसेच पंचवीस हजारांची रोकड असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल त्यांनी जबरी चोरी करून लुटून नेला.
या जबरी लुटीने परिसरात घबराट पसरली असून श्रीरामपूर शहर पोलिसांत तिघा लुटारुंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जबरी चोरीचा पोलिसांनी लवकरात लवकर तपास लावून आरोपींना गजाआड करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015