logo

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर - हर्षवर्धन पाटील

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर - हर्षवर्धन पाटील
-शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य
इंदापूर : प्रतिनिधी दि.8/12/25
महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व सहयोग मा.बाबुराव बोत्रे पाटील चेअरमन ओंकार शुगर अँड डिस्टिलरीने चालु सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता रु. 3200/- प्रमाणे असून, उर्वरित रु. 150 प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीला अदा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना उत्कृष्टपणे चालू असून आज अखेर कारखान्याने 1,65,000 मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगरचा सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या सहयोगातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम यशस्वीपणे केले जात आहे. ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांचे माध्यमातून प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला सर्व ऊस हा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरीस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना हा गेले 8-10 वर्षापासून आर्थिक अडचणीला सामोरे जात होता. तरीही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन येणाऱ्या आर्थिक अडचणीवर मात करून प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी व्हावेत, असे प्रयत्न अडचणीत काळातही ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू होते. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांचे सर्वोच्च हित लक्षात घेऊन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना व ओंकार शुगरचा सहयोग हा (कोलाब्रेशन ) सहकारातील सेक्शन 20 नुसार सहकार टिकवण्यासाठीचा पहिलाच नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी होत आहे. सदरच्या संयुक्त तत्वाच्या निर्णयासाठी सभासदांचे सहकार्य लाभले आहे. श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी उभारलेल्या या संस्थेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेली 35 वर्षे संसार प्रपंच यशस्वीरित्या मार्गी लागले आहेत. त्यातून शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आहे. त्यामुळे कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देणेसाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून काम करू या, असे प्रतिपादनही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक विजय शिर्के उपस्थित होते.

1
99 views