logo

अज्ञात मयताची ओळख पटवून खूनाचे गुन्ह्याचा खुनाचा उलगडा करण्यात पालघर पोलीसांना यश. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांची उत्कृष्ट कामगिरी….

दिनांक १२/०७/२०२५ रोजी कसारा पोलीस ठाणे जि. नाशिक यांचेकडून माहिती मिळाली की, मोखाडा पोलीस ठाणेचे हद्दीत वैतरणा धरणाचे पुलाजवळ एक प्रेत असल्याचे कळविल्याने खोडाळा दुरक्षेत्र येथील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून खात्री केली असता एका इसमाचे प्रेत दोन्ही पाय जंगली वेलीने बांधलेल्या स्थितीत मिळून आल्याने दिनांक १२/०७/२०२५ रोजी मोखाडा पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यु रजि क्र २३/२०२५ अन्वये दाखल करण्यात आला. सदर अ.मृ.ची चौकशी चालु असतांना मयताची ओळख पटवून त्याचे नाव शरद कोंडाजी बोडके, वय-३१ वर्षे रा. मोहाळे ता. इगतपुरी जि. नाशिक असे असल्याचे समजले. मयताचे पाय जंगली वेलीने बांधलेच्या संशयावरून मयताच्या नातेवाईकाकडे केलेल्या चौकशीवरुन दिनांक १३/०८/२०२५ रोजी लक्ष्मी मोहन येलमामे, वय-३२ वर्षे रा.शनिमंदीराजवळ सिडको, नाशिक ता. जि. नाशिक यांचे तक्रारीवरुन मोखाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र १५७/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१),२३८(अ), ३ (५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. यतिश देशमुख पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर मयताचे गावी मोहाळे येथे कसून चौकशी करून व तांत्रिक तपासाच्या सहाय्याने कौशल्यपूर्ण तपास करून खूनाच्या गुन्हयाची उकल करून एकूण पाच आरोपी निष्पन्न केले. आरोपीत नामे १) संतोष ऊर्फ अरुण लक्ष्मण धात्रक, वय ३६ वर्ष, रा. समर्थनगर वैभय तिर्थ रो हाऊस नं.२, पंचवटी नाशिक २) शिवराम लक्ष्मण वाघ, वय २९ वर्षे, रा. उंबरडा ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, ३) गोकुळ पांडुरंग बेंडकोळी, वय-२९ वर्षे रा. गडगड सांगवी, ता. इगतपूरी, जि. नाशिक ४) गणेश बाळू बेंडकोळी वय-२२ वर्षे रा. गडगड सांगवी ता. इगतपुरी, जि. नाशिक ५) संजय संपत पोटकुले, वय-३० वर्षे रा. गडगड सांगवी ता. इगतपूरी, जि. नाशिक यांनी गुन्ह्यातील मयत शरद कोडाजी बोडके हा आरोपीत क्रमांक १) संतोष ऊर्फ अरुण लक्ष्मण धात्रक यांना वेळोवेळी जमीनीच्या वादावरुन दादागिरी करायचा तसेच मयत याने मागील झालेल्या भांडणात आरोपीत क्र १ याचे आई वडीलांना मारहाण केली होती त्याचप्रमाणे त्याचे मामाचा पाय
मोडुन टाकला होता. त्याचा राग मनात धरुन वरील आरोपी यांनी संगणमत करुन मयत यास दारू पाजण्याचे निमीत्त करुन आरोपीत यांची स्वीप्ट डिजायर वाहन क्र. एम एच १५ जे डब्ल्यु ०८०७ या वाहनाने जांभळपाडा ता. त्र्यंबकेश्वर येथे निर्मनुष्य ठिकाणी घेवून जावून मयत यास दारु पाजून लाथा-बुक्क्याने मारहाण करुन त्याचा गळा आवळून त्यास जिचे ठार मारून त्याचे जंगली वेलीने पाय बांधन त्यास वरील वाहनात टाकून मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत वैतरणा धरणाचे पुलाजवळ आणून पाण्यात टाकुन निघुन गेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. वरील पाचही आरोपीस अटक केले असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा सपोनि/प्रेमनाथ ढोले, मोखाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. समिर मेहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री. प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, पालघर, सपोनि योगेश शिंदे, पोउपनि/वानखेडे, पोउपनि/खोत, पोउपनि/गोरखनाथ राठोड, श्रेणी पोउपनि/नलावडे, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/संजय धांगडा, पोना/कल्याण केंगार, पोअं/प्रशांत निकम, पोअं/महेश अवतार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर व पोअं/रूपेश पाटील, नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

11
883 views