वाळूमाफियांना धूळ चारणारा वाहनांचा परवाना रद्द करणार...
जळगाव राज्यातील वाळूतस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता वाळूतस्करी करणारे वाहन तीनवेळा पकडले गेल्यास त्या वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रह करून बाहनही जप्त केले जाणार आहे. महसूल विभागाने बुधवारी याबाबतचे शासन परिपत्रक जारी केले आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे सरकारी महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी होते. याशिवाय अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत असून, कारवाईसाठी जाणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.वाहनांचा परवाना निलंबित, रद्द होणारअवैध गौण खनिजांच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे डील मशीन, जेसीबी, पोकलेन, ट्रैक्टर-ट्रॉली, डंपर यासारख्या सर्व प्रकारच्या वाहनांवर तसेच अवैध उत्खनन करणाऱ्या साधनांवर ही कारवाई केली जाणार आहे.अवैध वाळू तस्करीला बसणार चापमहसूल आणि परिवहन विभागाने एकत्रितपणे है कठोर धोरण लागू केले आहे. वाळूमाफियांकडून होणारी शासनाची फसवणूक आणि पर्यावरणाचा हास थांबवणे हे या कारवाईचे मुख्य उद्दिष्ट आहे. केवळ वाळूच नाही, तर इतर गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवरही ही कारवाई लागूअशी होणार कारवाईपहिला गुन्हाः परवाना (परमिट) ३० दिवसांसाठी निलंबित करणे आणि वाहन तात्काळ अटकवून ठेवणे.दुसरा गुन्हा : परवाना (परमिट)६० दिवसांसाठी निलंबित करणे आणि वाहन अटकवून ठेवणे.तिसरा गुन्हा : संबंधित वाहनाचापरवाना कायमस्वरूपी रद्द करणे आणि पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत वाहन जप्त करणे.महसूल विभागाच्या क्षेत्रीय पथकांनी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती तत्काळ परिवहन विभागाला द्यावी. जेणेकरून जागेवरच परवाना रद्द करण्याची कारवाई करता येईल. अवैध वाहतुकीचे रॅकेट मोडीत काढण्याचा आमचा संकल्प आहे.डॉ. श्रीमंत हारकर, अपर जिल्हाधिकारी.