logo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली

दिनांक ०६/१२/२०२५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) डॉ. एस. राधाकृष्णन शिक्षण महाविद्यालय साकोली येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक न्याय, समानता, बौद्धिकता आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आयुष्यभर झटणाऱ्या ज्ञानाच्या अथांग महासागराच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. त्यानंतर सर्व अध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी शांततेत दोन मिनिटे मौन पाळून महान व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषण, कविता, यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मालता सहारे, साक्षी राजगिरे, पायल नागदेवे, उज्वला करंजेकर यांनी सादर केलेल्या विशेषतः शिक्षण, समानता, स्त्री-पुरुष समानता आणि भेदभावमुक्त भारत या विषयांवरील विद्यार्थी निर्मित कविता प्रभावी ठरल्या.यानंतर आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. चेतन कापगते यांनी डॉ. आंबेडकरांचे भारतीय संविधानातील योगदान, सामाजिक परिवर्तनासाठी केलेले प्रयत्न, शिक्षणावरील त्यांचा दृष्टिकोन आणि ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या महत्त्वपूर्ण संदेशाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहनही केले. प्राध्यापिका शैला धनजोडे यांनी कवितेच्या माध्यमातून डॉ.आंबेडकरांचे समतावादी विचार सर्वांसमोर ठेवले. तसेच प्राध्यापिका मृणालिनी बावनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंग सर्वांसमोर मांडले. विभाग प्रमुख प्रा.अक्षय पुस्तोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे भारताची बौद्धिक संपत्ती असून, आजची तरुण पिढी त्यांचे मूल्य आत्मसात करून पुढील पिढ्यांसाठी उज्वल भविष्य घडवेल.” कार्यक्रमांमध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.कार्यक्रमाचा समारोप भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे एकत्रित पठण करून करण्यात आला. उपस्थितांनी लोकशाही, बंधुता, समानता आणि न्याय या मूल्यांची दृढप्रतिज्ञा व्यक्त केली. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्रुत सहारे तर आभार प्रदर्शन सोनिया टेंभुर्णे बीएड प्रथम वर्ष हिने केले.

110
4199 views