logo

दिवा शहरातील स्पीड ब्रेकर दुरुस्तीचा प्रश्‍न चिघळला

दिवा (प्रतिनिधी) — दिवा शहरातील स्टेशन परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आगासन फाटकापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर अत्यंत खराब अवस्थेत असून, त्यांची दुरुस्ती करण्यास प्रशासनाकडून अजूनही कोणतीही हालचाल झालेली नाही.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा अर्ज करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. खराब स्पीड ब्रेकरमुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून कधीही गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या स्थितीवर प्रतिक्रिया देताना, विकास पोहरकर, शहर अध्यक्ष – आजाद समाज पार्टी दिवा, यांनी प्रशासन आणि दिवा शहर प्रभार समितीवर निष्क्रियतेचे आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

4
119 views