बीडच्या बालेपीर काझी नगरात नालीचे पाणी घरात! नागरिकांचा गंभीर आरोप – सफाईसाठी नगरपालिका कर्मचारी ‘पैसे’ मागतात
बालेपीर काझी नगर परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नाल्यांची साफसफाई न झाल्याने घाण पाणी थेट घरात शिरत असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी वाढली आहे.
स्थानिकांनी AIMA MEDIA – जन-जन की आवाज सोबत बोलताना गंभीर आरोप केला आहे:
👉 “सफाईसाठी नगरपालिका कर्मचारी पैसे मागतात. पैसे दिल्याशिवाय काम करत नाहीत.”
नागरिकांचे म्हणणे:
“आमच्या घरात नालीचे पाणी येते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर आरोग्याचा धोका आहे. अनेकदा सांगूनही प्रशासन जागत नाही."
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी असून तातडीने नालेसफाई आणि चौकशीची मागणी केली जात आहे.
📌 AIMA MEDIA ची मागणी:
नालेसफाई त्वरित सुरू करावी
गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चौकशी
नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरणाची हमी