
दर्डा विधी महाविद्यालयात डॉ. आंबेडकरांना अभीवादन
यवतमाळ:- विद्या प्रसारक मंडळ संचालीत स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमीत्य अभीवादन करण्यात आले.यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विजेश मुणोत, डॉ. संदीप नगराळे , डॉ. वैशाली फाळे उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. संदीप नगराळे ह्यांनी महापुरूषांचे स्मरण करतांना त्यांच्या कार्यकर्तृत्व, भाषणे, साहीत्यातुन आपण प्रेरणा घेणे गरजेचे असल्याचे म्हटले तसेच डॉ. बाबासाहेब ह्यांचे आर्थिक विचार, सामाजिक विचार, लोकशाही , संविधान व कायदे यासंबंधी विवेचन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. विजेश मुणोत ह्यांनी डॉ. बाबासाहेब यांचे विद्यार्थी जिवन तसेच संपूर्ण आयुष्य हे विद्यार्थ्यांनी समजून घेऊन त्यापासून प्रेरणा घ्यावी अशी भुमीका मांडली.
यावेळी क्रांतीकुमार झामरे, कु. पलक तेलंग , सौरभ कांबळे आदी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पीत केली.
कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ . वैशाली फाळे ह्यांनी प्रास्तविक केले.
यावेळी विधी विद्यार्थ्यांची मोठया संखेने उपस्थिती होती.