logo

धर्मेंद्र यांनी दमदार अभिनयाने सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य केले - हर्षवर्धन पाटील

धर्मेंद्र यांनी दमदार अभिनयाने सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य केले - हर्षवर्धन पाटील
-धर्मेंद्र यांच्या इंदापूर व बावडा भेटीच्या आठवणींना दिला उजाळा
इंदापूर : प्रतिनिधी दि.24/11/25
प्रसिद्ध सिने अभिनेते धर्मेंद्र यांनी दमदार अभिनयाने सुमारे सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य केले. त्यांच्या सदाबहार अभिनयामुळे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले, या शब्दात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सिने अभिनेते धर्मेंद्र यांच्या इंदापूर व बावडा येथील भेटीच्या आठवणींना सोमवारी उजाळा दिला.
सिने अभिनेते धर्मेंद्र यांच्या बोलण्यात नम्रता व आपुलकीची भावना असे. त्यांचे व्यक्तिमत्व माणुसकी जपणारे होते. त्यांच्या जाण्याने देशातील सिनेसृष्टीचा मार्गदर्शक हरपल्याची भावना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
सिने अभिनेते धर्मेंद्र हे सन 1999 मध्ये इंदापूर शहर व बावडा येथे माझे निमंत्रणावरून आले होते. एक दिवस ते इंदापूर तालुक्यात होते. इंदापूर येथे शहर नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर धर्मेंद्र यांनी बावडा येथे माझ्या रत्नाई निवासस्थानी भेट देऊन महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांना मी बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या फेट्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसत होते. देशातील वलयांकित असे प्रसिद्ध अभिनेते असूनही धर्मेंद्र यांचे वागणे बोलणे साधेपणाचे होते, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
____________________________
फोटो

0
279 views