अवैध गौणखनिज उत्खनन रोखण्यासाठी सामूहिक मिशन!
जळगाव : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक नियंत्रणाविरोधात कारवाई करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ महसूल विभागाकडूनच कारवाई अपेक्षित नाही. म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तीनही विभागांची बैठक घेत माफियांविरोधात सामूहिक मिशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह आरटीओ, जिल्हा खनिकर्म निवासीरोजच अहवाल देणार माफियांविरोधात कारवाई सत्रराबविताना वाहन जप्ती, दंडात्मक कार्यवाही, गुन्हे नोंदणी, परवान्यांच्या निलंबनाची कारवाई तातडीने केली जाणार आहे. त्यात कुठलीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित विभागांनी कारवाईचा रोज अहवाल सादर करणे व नोंद वही अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.अधिकारी, सर्वच प्रांताधिकारी व डीवाय.एस.पींसह तहसीलदार सहभागी झाले होते. अवैध गौण खनिजाचा उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई सत्र राबविण्यासाठी तीनही विभागांनी संयुक्त गस्त करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.