अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्त उतरल्या फिल्डवर
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कमी दिवसांत हा घोळ मिटवायचा असल्याने शनिवारी सुटीचा दिवस असूनही अतिरिक्त
आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह सर्व उपायुक्त व मुख्य लेखा परीक्षक फिल्डवर उतरले होते. त्यांनी स्वतः मतदारांची खात्री केली.
या याद्यांमध्ये तब्बल १८,७५५ हरकती दाखल झाल्या आहेत, तर आतापर्यंत दहा हजार हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत.