
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत
सहभागी होण्याची आवाहन
*प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन*
*अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर*
*गोंदिया, दि.1 :* विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक, कीड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी कारणामुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अधिसूचित क्षेत्राकरिता (तालुका देवरी,सडक/अर्जुनी,तिरोडा,मोरगाव/अर्जुनी) अधिसूचित पिकाकरीता (पीक- हरभरा) शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेता येईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2025 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी रुपेश मेश्राम यांनी केले आहे.
*महत्वाच्या बाबी*
या योजनेत भाग घेण्यासाठी फार्मर नोंदणी क्रमांक व ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. ई-पीक व विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टलवरून जमा करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्याकरिता नियुक्त