logo

'लाच' विरोधी सप्ताहात जाहीर शपथ घेतली तरीही चिरमिरी मागायची सवय नाही सुटली...

जळगाव : भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी व्हावी, तसेच लचखोरीला आळा बसावा, यासाठी दक्षता जनजागृती सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले. लाच न घेण्याची शपथ घेण्यात आली, मात्र या सप्ताहातही लाचेचा मोह काही सुटला नाही. हा सप्ताह राबविला जात असतानाच पारोळा वनविभागातील वनपाल महिलेसह कर्मचारी व खासगी इसमाने लाचेची मागणी केल्याने तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 'दक्षता च जनजागृती सप्ताह २०२५'चे आयोजन केले होते. या सप्ताहात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू असतानाही लाच मागितल्याचा प्रकार समोर आला व या सप्ताहादरम्यानच तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

तीन जण अडकले जाळ्यात

दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असतानाच तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पारोळा वनविभागाची वनपाल महिला, एक कर्मचारी व एका खासगी इसमाविरुद्ध एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जाळ्यात अडकले. तिघांविरुद्ध ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला.

महसूलमध्ये सर्वाधिक लाचखोरांवर कारवाई

यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दरम्यान करण्यात आलेल्या कारवायांमध्ये सर्वाधिक सात कारवाया महसूल विभागात झाल्या आहेत. त्या खालोखाल जिल्हा परिषद ६, पोलिस ४, शिक्षण विभाग ३, महानगरपालिका २ जणांवर कारवाई करण्यात आली.

18
1272 views