logo

विरदेल येथील पोस्ट ऑफिस(डाकघर) ची जागा चांगल्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी..(डॉ.पवन राजेंद्र बेहेरे यांची शिंदखेडा तहसीलदारांकडे मागणी)

(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील ग्रामपंचायत परिसरात असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये एका छोट्याशा शॉप मध्ये पोस्ट ऑफिस हे चालू करण्यात आले आहे...भारतातले महत्त्वाचे मानले जाणारे पोस्ट ऑफिस हे सामान्य लोकांची बँक ही मानली जाते...
विरदेल पोस्ट ऑफिस ची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे की पोस्टमन व त्यांचे कर्मचाऱ्यांना बसायची सुद्धा व्यवस्था नाही व त्याचबरोबर आता सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर गावातील व परिसरातील लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी जात असतात अशाच परिस्थितीत त्यांना बसायला सुद्धा व्यवस्था नाही.. त्या ठिकाणी ज्या महिलांनी सांगितले की उभे राहण्यासाठी अजिबात चांगली जागा नाही.. आफीस मध्ये ..ना पिण्याच्या पाण्याची सोय नाही.. ना फॅनची सोय नाही.. त्याच बरोबर विरदेल गावाची बंद पडलेली भाजीपाला मार्केट चा संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य मोठ्या माणावर प्रत्यक्ष दिसून आलेले आहे..त्या ठिकाणी ते पोस्ट ऑफिस आहे अशा ठिकाणी असलेल्या बिकट परिस्थितीला त्याकडे प्रशासनाचे व विरदेल ग्रामपंचायती चे अजिबात लक्ष नाही असे दिसून येते..
त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी यांनी सांगितले की आम्ही बऱ्याचदा सांगून सुद्धा आमच्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही, आम्ही शेवट कर्मचारी आम्हाला ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो..पोस्ट ऑफिसमध्ये कागदपत्र ठेवण्याच्या कपाटीला साधा दरवाजा सुद्धा नाही. व त्याचबरोबर ऑफिसमध्ये वाळूचे ढिगारे दिसून आलेले,,खूप मोठ्या प्रमाणावरती घाण झालेली निदर्शनात आले..अत्यंत भयानक अशी परिस्थिती आपल्या विरदेल गावाच्या पोस्ट ऑफिस मध्ये आहे म्हणून लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन चांगल्या ठिकाणी पोस्ट ऑफिस ला चौकात जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणी साठी शिंदखेडा तहसील कार्यालय येथे जाऊन माननीय तहसीलदार श्री.नितीनकुमार देवरे (साहेब) यांची भेट घेवून विरदेल ग्रामपंचायत परिसरात असलेले पोस्ट ऑफिस ( डाक घर ) साठी समाधानकारक जागा उपलब्ध करून देण्याबाबत किंवा नुतनीकरण करण्याबाबत विनंती पूर्वक निवेदन देण्यात आले व विरदेल गावाच्या विविध विकास कामांबद्दल चर्चा करण्यात आली. त्यावेळी विरदेल येथील युवानेते डॉ.पवन राजेंद्र बेहेरे व मित्र परिवार गावातील नागरिक हे उपस्थित होते.

26
3084 views