logo

तिर्रट जुगार खेळणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल. 6,70,240/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

तिर्रट जुगार खेळणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल. 6,70,240/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील लेबर कॉलनी परिसरातील एका घरावर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 12 जणांना ताब्यात घेतले आहे.
यामध्ये 06,70,230/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लेबर कॉलनी येथे 19/07/2025 रोजी 22.00 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यादरम्यान 12 आरोपी तिर्रट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 06,70,230 रुपयाचा चा मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये आरोपी

1)फारुख ऊर्फ पाशामाई युसुफ मोमीन, वय 58 वर्षे रा. लेबर कॉलनी लातुर,

2) गफार अब्दुलसाब मणीयार, वय 58 वर्षे रा. हत्तेनगर लातुर.

3)शादीक गफुर बागवान वय-31 वर्षे, रा. ताजुद्दिनबाबा दर्गा, लातूर.

4)सलिम अब्दुलवहाब कुरेशी वय 58 वर्ष, रा. काझीमोहल्ला.लातूर

5) मुस्तफा इस्माईल चौधरी वय-54 वर्षे, रा. प्रकाशनगर, लातुर.

6) आसीफ इस्माईल पठाण, वय 54 वर्षे रा. लेबरकॉलनी लातुर.

7) महेश श्रीराम सुर्यवंशी, वय 50 वर्षे रा. लेबरकॉलनी, लातुर

8)अन्वर पाशा सय्यद वय-35 वर्षे रा. ईस्लामपुरा, लातूर.

9)मिरमहमद मिररजा सय्यद, वय 45 वर्षे रा. झिंगणअप्पागल्ली लातुर.

10) महताब कलीम बागवान, वय 28 वर्षे रा. बागवान गल्ली, लातुर.

11)वासीक एजाजअहमद सिद्दीकी, वय 50 वर्षे, रा. लेबर कॉलनी लातुर.

12)अब्दुलसत्तार मदारसाहब शेख, वय 57 वर्षे रा. खोरेगल्ली लातुर.

असे बेकायदेशिर रित्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना जुगाराच्या साहित्य, रोख रक्कम, मोबाईल व वाहने असे एकुण 06,70,230/-रुपयाच्या मालासह मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे , युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, बोचरे यांनी केली आहे.

27
1704 views